
तक्रारकर्ती हि मौजा चिमुर ता. चिमुर जि. चंद्रपुर येथील रहीवासी असुन ती शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर येथे तासिका / मानधन तत्त्वावर गणित व अभियांत्रिकी चित्रकला निर्देशक म्हणुन नेमणुकीस आहे. तक्रारकर्ती यांचे माहे फेब्रुवारी / २०२२ ते मे / २०२२ पर्यंतचे चार महिन्याचे मानधन काढुन दिल्याचे मोबदल्यात व उर्वरित पुढील तिन महिन्याचे मानधन काढण्याचे कामाकरिता शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर येथील श्री. शांताराम किसनदास राठोड, गटनिदेशक (कंत्राटी) यांनी दि. ११/०८/२०२२ रोजी तक्रारकर्ती कडे १२,०००/- रु. ची मागणी केल्याच्या पडताळणी कार्यवाहीवरुन आज दिनांक १८/०८/२०२२ रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाहीदरम्यान श्री. शांताराम किसनदास राठोड, गटनिदेशक (कंत्राटी) यांनी तक्रारकर्तीकडे १२,०००/- रु. लाचेची मागणी केल्याने दोघे निर्देशकांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही श्री. राकेश ओला, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, श्री. मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, श्री. अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. जितेंद्र गुरनुले, नापोकॉ. नरेशकुमार नन्नावरे, नापोकॉ. संदेश वाघमारे, पो.अ. अमोल सिडाम, रविकुमार ढेंगळे, म.पो.अ. मेघा मोहुर्ले व ला. प्र.वी. चंद्रपुर चालक सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.


