चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य दरात कोळसा पुरवठा – खा. बाळू धानोरकर

खा. बाळू धानोरकर यांचे प्रयत्नांना मोठे यश

चंद्रपूर : महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील उद्योगांना भासणारीकोळशाची निकड लक्षात घेता खा.बाळू धानोरकर यांनी वेकोली व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र राज्य खान महामंडळ नागपूर साठी लघु व मध्यम श्रेणीच्या उद्योगांकरिता कोल इंडिया च्या माध्यमातून वेकोली तर्फे 4,90,000 टन कोळसा मंजूर झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नोडल एजन्सी मार्फत (MSME)लघु व मध्यम श्रेणी उद्योगांना कोळशाचे वाटप होण्याकरिता चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी मा. उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना पत्र क्र.2212/2022 दि. 22.05.2022 याद्वारे आग्रह केला होता.

महाराष्ट्र विशेषतः विदर्भात सद्याचे उद्योग सर्वांधीक इंधनासाठी कोळशाचाच वापर करतात. उद्योगांच्या उत्पादनात कोळशाचा घटक हा मुख्य आहे. बाजारात कोळशाच्या किमती अतोनात वाढलेल्या आहे, व कोरोना काळात होरपळलेल्या उद्योगांना महाग कोळसा परवडणार नाही हे लक्षात घेऊन खा. बाळू धानोरकर यांनी वेकोली व मा. मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करून लघु व मध्यम श्रेणी उद्योगांसाठी महाराष्ट्र शासना कडून (MSMC) महाराष्ट्र राज्य खान महामंडळा मार्फत अधिसूचित दरावर कोळसा वाटप मंजूर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील उद्योगांना MSMC च्या माध्यमातून योग्य दरात कोळसा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून विदर्भ औद्योगिक विकास महामंडळ असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा यांना खा.बाळू धानोरकर यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *