चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

भाजीपाला वाडीत आढळला बिबटचा पिल्लू

पिल्लाला पकडून सुरक्षित ठिकाणी हलविले

चंद्रपूर :  मुल तालुक्यातील एका भाजीपाला वाडीत साडेतीन वर्षाच्या बिबटचा पिल्लू आढळून आला आहे. वनविभागाने त्याला पकडून सूरक्षित ठिकाणी हलविले आहे. वाडीत पिल्लू दडून असल्याची घटना काल गुरूवारी दुपारच्या सुमारास आढळून आली.

काल गुरूवारी मुल तालुक्यात दुपारी 3.30 वाजता चिचपल्ली रेंज मधील उथळपेठ या गावातील वामन कीन्नाके यांच्या भाजीपाल्याचा वाडीत बिबट चा पील्लु असल्याची माहिती गावक-यां मिळाली. त्याला पाहण्यासाठी न्गरिकांनु एकच गर्दी केली. या बाबत वनविभाग व संजीवन पर्यावरण संस्था, मूलच्या सदस्यांना माहिती देण्यात आली. वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी त्वरीत पोहोचले.

चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रीयंका वेलमे यांचे मार्गदर्शनात संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांनी बिबटच्या पिल्लाला सुरक्षीतपणे पकडून टी.टी.सी. चंद्रपुरला हलविण्यात आले आहे. सदर पिल्लू हा साडेतीन महिण्याचा आहे. सदर कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहाय्यक पी.डी खनके, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रभाकर धोटे, स्वप्नील आक्केवार, वनरक्षक पी.एस. मानकर, शीतल चौधरी व वनमजुर उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.