चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

घुग्घुस शहरातील नळ कोरडे; शहरवासीयांचा डोळ्यातून येतोय पाणी

घुग्घुस (चंद्रपूर) :  उन्हाळ्यात चंद्रपूरात सूर्य आग ओकू लागतोय. अंगाची लाही लाही होतेयं. एकीकडे सूर्य आग ओकत असतांना घूग्घूस शहरात भिषण पाणी टंचाई सूरू आहे. शहरातील नळ कोरडे पडले आहेत. पाण्यासाठी वणवण भटकतांना शहरवासीयांचा डोळ्यात पाणी येत आहे. या भिषण पाणी टंचाईला जवाबादार कोण ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. घुग्घूस शहरात 12 लाख लिटर क्षमतेच्या तीन जलकुंभ, (पाणी टंकी) मधून दररोज 22 लाख लिटर पाणी शुध्दीकरण होवून शहरातील सहा वॉर्डांत 48 पंपाच्या माध्यमातून दिवसाला 40 मिनिट पर्यंत 5660 करदाते घरापैकी 2800 घरांना पेयजल आपूर्ति केल्या जाते. शहरात 175 सार्वजनिक नळ असून 170 बोअरवेल देखील आहे. दोन वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून शहरातील विविध वॉर्डांत 09 वॉटर एटीएम मधून दोन हजार लिटर प्रमाणे 18 हजार लिटर पाण्याची पूर्तता केली जाते. यांच्यातही विशेष बाब म्हणजे शहर हा दोन भागात विभागला असून अर्धा भाग हा वेकोलीच्या अखत्यारीत असून येथील क्वार्टर मधील नागरिकांना वेकोली तर्फे पाणी पुरवठा केल्या जातो. गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून शहरातील एक समाजसेवी ज्यांना नागरिक वॉटरमेनच्या नावाने ओळखतात असे राजुरेड्डी आपल्या दोन ते तीन खाजगी टँकरने शहरात व परिसरातील गाव खेड्यात मागेल त्याला मोफत पाणी देत आहे. शहरातील भीषण पाणी समस्येची जाणिव होताच त्यांनी शहरातील उद्योगांच्या माध्यमातून वॉटर टँकरची मागणी केली होती. त्याला ही यश प्राप्त झाले नगरपरिषदेची निवडणूक येत्या काही महिन्यात होणार असून गेली पाच वर्ष जे ग्रामपंचायतीत सतेत होते त्यांच्या काळातीलच पाणी पुरवठा योजना शहरात असून काही नवीन नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आले. आज निवडणुकीच्या तोंडावर सेवा केंद्र ही स्वतःच्या वॉटर टँकरने शहरात पाणी पुरवठा करण्यास सज्ज झाला आहे. याला आता समाजसेवा नाव द्यायचे की राजकीय अगतिकता ? मात्र शहरात होत असलेल्या भीषण पाणी टंचाईला जवाबदार कौन ? हा प्रश्न सध्या शहरात चर्चिला जात आहे. नगरपरिषद पाणी पुरवठा करण्यास सपशेल फेल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.