चंद्रपूर (का. प्र ) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आता पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नितीन मोहीते व सहाय्यक आयुक्त औषधी,अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर पी. एम बल्लाळ यांनी दिली आहे मजबूत पुरवठा साखळी विकसित होईपर्यंत विक्रेत्यांशी, निर्मात्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभाग हे काम बघणार आहे. सध्या चांडक मेडिकलच्या 6 वेगवेगळ्या दुकानात पीपीई किट उपलब्ध आहेत. यासंदर्भात ऑर्डर दिल्यास 10 मिनिटात ती उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते. बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर यासारख्या प्रमुख तालुक्यात एका दुकानात पीपीई किट उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर विक्रेत्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.सामान्य नागरिकांना पीपीई किट उपलब्ध होणार नसून फक्त जिल्ह्यातील डॉक्टर, नर्सेस, खाजगी दवाखाने, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाच्या काळात पीपीई किट गरजेची आहे. त्यामुळे आता पीपीई किट सहज उपलब्ध होणार आहे.
Related Articles
अतिशय दु:खद बातमी प्रा. व्हि.एन.येरगुडे यांचे दु:खद निधन
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षण क्षेत्रातील महामेरू, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे साई इंजिनिअरिंग तथा साई पाँलिटेक्निकल काँलेजचे संस्थापक मा. विठ्ठलराव येरगुडे यांचे दिर्घ आजाराने रात्रोला पंत यांच्या हाँस्पिटलमध्ये दु:खद निधन झाले. म्रुत्यु समयी त्यांचे वय ६७ वर्षाचे होते. त्यांना महाविदर्भ परिवारातर्फे भावपुर्ण श्रध्दांजली!
१ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाळला ” काळा दिवस – विश्वासघात दिवस “
* ” महाराष्ट्र मिटाओ विदर्भ मिलाओ ” आंदोलनात चंद्रपूर येथे कार्यकर्ते ताब्यात * ६ तालुक्यात विदर्भाचे स्टिकर लावले सरकारी कार्यालयांवर चंद्रपूर, – विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिनांक १ मे २०२२ हा महाराष्ट्राने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला म्हणुन काळा दिवस पाळण्याचे आंदोलन घोषीत केल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यात कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे अशा जोरदार […]
एक विचित्र अपघातात कार ने दिली दुचाकीला धडक
बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एक विचित्र अपघात घडला आहे. यामध्ये एक भरधाव वेगाने येणारी कार एका दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर धडकली. या अपघातात अगदी थोडक्यात बचावलेला दुचाकीवरील युवक काही घडलेच नाही असे भासवत भरधाव वेगात पुढे निघूनही गेला. तर ती भरधाव कार दुभाजकावर धडकल्याने वाहतूक खांब कोसळून पलटी झाली. सुदैवाने या अपघातात गाडीतील कोणालाही […]



