चंद्रपुर

आता विना शिधापत्रिकाधारकांना सुद्धा मिळणार मोफत तांदूळ व चना

Ø पात्र लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध होणार
Ø लाभार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे धान्य वितरण दुकानाची माहिती देण्यात येणार
चंद्रपूर (का. प्र )ज्या कुटुंबाकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजनेअंतर्गत कोणतीही शिधापत्रिका नाही, ज्यांना अन्नधान्याची गरज आहे असे सामाजिक व आर्थिकदृष्टया दुर्बल, विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर अशा गरीब व गरजु शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना माहे मे व जून, 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरिता प्रति व्यक्ती प्रति माह 5 किलो तांदूळ मोफत वितरीत करण्याचे निर्देश आहेत. तसेच शासन पत्र दिनांक 27 मे, 2020 नुसार या लाभार्थ्यांना प्रति कुटुंब 1 किलो अख्खा चना मोफत वितरीत होणार आहे.अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात उपरोक्त शासन निर्णयानुसार प्रत्येक गावनिहाय व शहरी भागात वार्डनिहाय संबंधित तहसील, नगरपालीका, महानगरपालीका यांच्याकडून गरजु व्यक्तींची यादी तयार करण्यात आली असून या यादीनुसार जिल्ह्यात 32 हजार 642 कुटुंबामधील 1 लाख 16 हजार 124 लाभार्थी व्यक्ती निश्चित करण्यात आले असून या सर्व लाभार्थ्यांना निश्चित केलेल्या स्वस्त धान्य दुकानातून जून महिन्यात मे व जून या दोन्ही महिन्याचे धान्य एकत्रितपणे म्हणजेच 10 किलो प्रति व्यक्ती तांदूळ व 2 किलो अख्खा चना प्रति कुटुंब या प्रमाणे एकदाच वाटप करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *