चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

दिव्यांग मुलीचा जन्मदात्या पित्यानेच केला खून

चंद्रपुर :- दिव्यांग मुलीचा जन्मदात्या पित्यानेच खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी शहरातील शामनगर येथील डॉ. आंबेडकर चौकात उघडकीस आली असून आरोपी पित्याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. मृणाली बारापत्रे असे मृत मुलीचे नाव तर विजय नारायण बारापात्रे असे अटकेत असलेल्या आरोपी पित्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृणाली ही दिव्यांग आहे. तिला जन्मानेच मानसिक व शारीरिक विकलांगता आहे. विकलांगता असल्याने फार चालू शकत नव्हती. 23 सप्टेंबर रोजी मृणाली हिने आपल्या जागेवरच शौच केले व सारखी ओरडत असल्याने विजय बारापात्रे या पित्याला सहन झाले नाही. तसेच तिच्या सततच्या दिव्यांगपणाला कंटाळले होते. त्यानंतर आरोपी पित्याने मृणाली हीचा रुमालाने गळा आवळून घरीच हत्या केली. त्यानंतर याची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला. दरम्यान पोलिसांचा संशय बळावल्यानं आरोपी पित्याला पोलिसांनी पोलिसी खाकी दाखवत विचारपूस केली असता आरोपी पित्याने गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलिसांनी सुरू केला आहे. आरोपी पित्यावर भांदवी 302, 202 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले, पोलीस हवालदार सुदाम राठोड, पोलीस शिपाई मंगेश सायंकार आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *