
राजुरा – काकू मला तहान लागली आहे, प्यायला पाणी मिळेल काय? हे उद्गार ऐकताच 55 वर्षीय कांताबाई देवराव घोटेकर पाणी आणण्यासाठी वळल्या असत्या, त्या इसमाने कांताबाई यांच्या गळ्यात असलेले सोन्याचे मंगळसूत्र हिसकवीत तिथून पळ काढला. ऑक्टोम्बरला भर दुपारी राजुरा शहरातील रामपूर येथे घडलेल्या घटनेने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. फिर्यादी कांताबाई यांनी याबाबत राजुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करीत, तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सखोल तपास करीत घटनेच्या दिवशीच गुन्हा उघडकीस आणला व आरोपीला अटक केली. विशेष म्हणजे आरोपीने मंगळसूत्र चोरी सहित 5 गुन्हे केल्याचा कबुली जबाब पोलिसांना दिला. सोमनाथ पुरा वार्ड राजुरा येथे राहणारे आरोपी 42 वर्षीय उत्तम दत्तूजी चौधरी याला अटक करण्यात आली असून यांचेसह पुन्हा 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी याआधी सोन्याचे मंगळसूत्र, दुचाकी वाहन व केबल चोरीचे गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बल्लारपूर येथील राज वर्मा या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपिकडून तब्बल 1 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वयोवृद्ध महिलांच्या घरी जात त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करण्यात आरोपी माहीर होते, मात्र राजुरा पोलिसांच्या ताब्यात यांचा गुन्हा फसला. सदरची यशस्वी कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि संतोष दरेकर, पोउपनी सदानंद वडतकर, पोलीस कर्मचारी खुशाल टेकाम, संदीप बुरडकर, किशोर तुमराम, विनायक कुलमेथे, महेश बोलगोडवार, रामराव भिंगेवाड व रवींद्र तुराणकर यांनी पार पाडली.




