यावेळी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनोद दत्तात्रय, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य – ठेमस्कर, भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, महिला काँग्रेस नेत्या चित्रा डांगे, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर, काँग्रेस नेते घनश्याम मुलचंदानी, कृषी उत्पन्न माजी सभापती दिनेश चोखारे, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शंतनू धोटे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, माजी नगरसेवक सुनीता अग्रवाल, ओबीसी नेते उमाकांत धांडे, रेल्वे उपभोक्ता सलाहकर समिती सदस्य राज यादव, सेवादल महिला पदाधिकारी स्वाती त्रिवेदी, राधिका तिवारी – बोहरा, सामाजिक सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते सचिन कत्याल, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, पप्पू सिद्धीकी, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, सुरज बोबडे यांची उपस्थिती होती.
भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. विविध जाती, धर्म, परंपरा आणि संस्कृतींना जोडणारा दुवा म्हणजे सण आणि उत्सव. खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित भाऊच्या दांडीयात दहा दिवस चालेल्या या दांडियात सर्वपक्षीय नेते, डॉक्टर, समाजात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर यांनी एका व्यासपीठावर हजेरी लावून एकात्मतेचा संदेश दिला.
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर आणि वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्सवात चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहरातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवून दांडियाची शोभा वाढवली होती.