चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

शिवणी – चिमुर मार्गावर जिप्सी अपघात, एक ठार तीन जखमी

चंद्रपुर :- सिन्देवाही तालुक्यातील शिवणी – चिमुर मार्गावरील शिरकाळा गावाजवळ जिप्सी चालकाचा वाहना वरून नियत्रंन सुटल्याने जिप्सी पलटून अपघात झाला. यात एका युवतीचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. शिवनी येथे आठवळी बाजार असल्याने बाजारात खरेदी करण्याकरीता शिरकाळा येथिल गावकरी बाजारात गेले होते, बाजारात खरेदी पूर्ण झाल्याने ते शिरकाळा येथे जाण्यास निघाले असता त्याना गावाकडे जानारी जिप्सी दीसल्याने जिप्सी थांबवून ते त्यात बसले. काही अंतर गेल्यानंतर जिप्सी चालकाचे वाहनावरील नियत्रंन सुटल्याने जीप्सी पलटली यात 18 वर्षीय तरुणी जागीच ठार झाली तर. तिचे वढील, आई व जिप्सी चालक हे जखमी झाले आहेत. घटनेची माहीती मिळताच सिन्देवाही पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहचून जखमीनां रूग्नालयात दाखल करून घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास सिन्देवाही पोलीस स्टेशनचे ठानेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात सिन्देवाही पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.