चंद्रपुर

जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर

चंद्रपूर दि ११ मे : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिनांक 2 मे रोजी आढळलेल्या पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या संपर्कातील परिवारासह आतापर्यंत घेण्यात आलेल्या 59 स्वॅब नमुन्यांपैकी सर्व 59 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्ण सध्या नागपूर येथे कोविड शिवाय अन्य आजारावर उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नागपूर रुग्णालयातून कळविण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आज दुपारी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 59 नागरिकांपैकी सर्व 59 अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. दरम्यान आतापर्यंत या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 95 लोकांची यादी तयार करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाच्या 47 चमू कार्यरत आहे. यांनी 11 मे रोजी या प्रतिबंधित क्षेत्रातील 2 हजार 152 घरांमध्ये राहणाऱ्या 8 हजार 540 नागरिकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये अतिगंभीर श्वसनाचा आजार असणारे 11 रुग्ण संशयित होते. मात्र त्यांचा देखील यासंदर्भातील अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.