चंद्रपुर

जनतेच्या हितासाठी जनता कर्फ्यू

चंद्रपूर (का.प्र ):चंद्रपूर शहर तसेच दुर्गापूर, पडोली,ऊर्जानगर, व बल्लारपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधी स्वयंपूर्तीने १० सप्टेंबर ते १३ सप्टेंबर व्यापारी वर्ग पर्यंत संचार बंदी लावण्याचा निर्णय घेतला असून आजपासून सुरु असलेल्या संचारबंदीमुळे चौका चौकात पोलिसांची चोक बंदोबंस्त असून सर्व प्रतिष्ठान दुकाने बंद असल्यामुळे रस्ते सुद्धा ओसाड दिसत आहे . कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूत सहभागी झालेल्या व्यापारी मंडळ चंद्रपूर रेडिमेड अँड होजीअरी असोशिएशन,चंद्र्पुर प्लाय अँड ग्लास असोशिएशन , चंद्रपूर फर्निचर असोशिएशन, चंद्रपूर टू व्हीलर ऑटोमोबाईल असोशिएशन, समाधान मार्केटिंग अँड कंपनी, चंद्रपूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोशिएशन, चंद्रपूर मशिनरी टूल्स अँड हार्डवेअर असोशिएशन,चंद्रपूर सराफा असोशिएशन,चंद्रपूर मिठाई रेस्टारेंट असोशिएशन,चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कॉम्पुटर डीलर असोशिएशन इत्यादींनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *