*आतापर्यतची बाधित संख्या ९६*
*जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित ४२*
चंद्रपूर (का. प्र ):चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ३० जून रोजी आणखी एक बाधित आढळून आला आहे.जिल्ह्यातील राजुरा शहरातील जवाहर नगर येथील वीस वर्षीय युवक औरंगाबाद येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. २९ जून रोजी या युवकाचा स्वॅब घेण्यात आला. ३० जून रोजी नमुना पॉझिटिव्ह आला. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव रुग्णाची संख्या ९६ झाली आहे. मात्र आतापर्यंत ५४ नागरिक कोरोना मुक्त झाले असून सध्या इलाज घेत असलेले सर्व ४२ बाधित वैद्यकीय दृष्ट्या स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.




