चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपुरातील विराट दिव्य धर्म सम्मेलनास सहभागी व्हा – हंसराज अहीर

चंद्रपूर  :- श्रीमद शंकराचार्य स्वागत समारोह समिती, चंद्रपूरच्या विद्यमाने दि. 18 ऑक्टोंबर रोजी श्री जगन्नाथ धाम, शकुंतला फार्म्स नागपूर महामार्ग, चंद्रपूर येथे राष्ट्रोत्कर्ष अभियान अंतर्गत विराट दिव्य धर्म सम्मेलनाचे आयोजन सायंकाळी 04 ते 07 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. श्री गोवर्धनमठ पुरी पीठाधिश्वर श्रीमद जगदगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांच्या बहुमूखी प्रतिभेचा संगम असणाऱ्या उदबोधनाचा लाभ चंद्रपूर, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यातील सनातन धर्म रक्षणार्थ व हिंदुत्व जीवन पध्दती अनुसरणाऱ्या राष्ट्रोत्कर्षाची भावना जोपासत परस्पर स्नेह, बंधुत्व, सद्भावना वैश्विक शांतीची अभिलाषा बाळगणाऱ्या सर्व धर्म समभाव राखणाऱ्या तमाम बंधू व माता भगिनींनी या संमेलनास उपस्थित राहुन घ्यावा असे आवाहन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.