

गोंडपिपरी :– गोंडपिपरी येथे २.५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यात सत्र २०२२-२३ च्या अर्थिक वर्षातील महाराष्ट्र राज्य अग्नीसुरक्षा अभियान योजना (जिल्हास्तर) व अंतर्गत अग्निशमन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत प्रभाग क्र ११ मधील जयसेवा चौकाचे सौंदरीकरण करणे, प्रभाग क्र. १० मधील दर्गा रोड ते बोबाटे यांच्या घरापर्यंत खडीकरण करणे, प्रभाग क्र. १२ मध्ये साईनाथ मास्टे ते रवी सोनटक्के यांचे घरापर्यंत कव्हर नाली बांधकाम करणे, प्रभाग क्र. १६ मधील सरोज मेश्राम ते अशोक भोयर यांचे घरापर्यंत कव्हर नाली व सिमेंट काँक्रेट रस्ता बांधकाम करणे, प्रभाग क्र. १६ मधील रवी गेडाम ते भय्याजी कुळसंगे यांच्या घरापर्यंत कव्हर नाली बांधकाम करणे, नागरी दलितेतर सुधार योजना अंतर्गत प्रभाग क्र. १७ मधील श्री साईनाथ झुंगरे ते छाया बोरकुटे यांच्या घरापर्यंत कव्हर नाली व पेव्हर्स बांधकाम करणे, प्रभाग क्र. १ मधील मनोज तुंदुरवार किराणा दुकानापासून ते मनोज माकोडे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे, अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात क्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्र. १ मधील कब्रस्तानाला संरक्षण भिंत बांधकाम करणे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्र. ४ मधील श्रीमती फुलाबाई नगारे ते व्यंकट पूर बायपास रोड पर्यंत एका बाजूने कव्हर नाली बांधकाम करणे, प्रभाग क्र. २. मधील गोंडपिपरी मूल रोड ते गंधर्व फुलझेले यांचेघरार्यंत दोन्हीं बाजूंनी कव्हर नाली बांधकाम करणे इत्यादी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता कुळमेथे, मुख्याधिकरी आशिष घोडे, उपनगराध्यक्षा सारिका मडावी, बांधकाम सभापती अनिल झाडे, महिला बाकल्याण सभापती वनिता देवगडे, पाणी पुरवठा सभापती सुनील संकुलवार, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सोनी दिवसे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, संभाजी येलेकर, नगरसेवक सचिन चिंतावार, वनिता वाघाडे, यादव बांबोळे, सुरेश चिलनकर, रंजना रमगिरकार, राकेश पून, मनोज नागापुरे, बालाजी चनकापुरे, नामदेव सांगडे, संचालक कृ.उ.बा.स. तथा युवक तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, श्रीनिवास कंदनुरीवार, रेखा रामटेके यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

