चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीची तात्काळ अंमलबजावणी करा.-हंसराज अहीर यांचे सिध्दबली संचालक मंडळाला निर्देश

चंद्रपूर- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने सिध्दबली ईस्पात लिमी. येथील पूर्व कामगारांचा नोकरीचा प्रश्न मार्गी लागला असून येत्या १ जुन पासून कामगारांना नियुक्ती व नियुक्ती आदेश देण्याचा निर्णय अहीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला. अनेक वर्षांपासून पूर्व कामगारांचा रोजगाराचा प्रश्न प्रलंबीत असल्याने हंसराज अहीर यांनी या प्रश्नाची दखल घेवुन सदर बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयात फेब्रुवारी महिन्यात सुनावणी घेतली होती. या सुनावणीचे फलीत असे की, आज कामगारांच्या उत्कर्ष व हिताचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक शासकीय विश्रामगृहात दि. २० मे, २०२३ रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत सिध्दवली कंपनी व्यवस्थापनाचे विनोद शर्मा, श्री. डोंगरे, श्याम मुंधडा, अभय सिंह, दिपक पराळे, कामगार प्रतिनिधी विनोद खेवले, विजय आगरे, उत्तम आमडे, संजय जुनघरे, विशाल आत्राम, मुन्ना कुशवाह, प्रदीप वासाडे, सत्यपाल खेवले यांचेसह अन्य उद्योग प्रतिनिधी व कामगारांची उपस्थिती होती. सिध्दबली ईस्पात लिमी च्या पुर्व व्यवस्थापनाअंतर्गत हे सर्व कामगार कार्यरत असतांना त्यांच्या रोजगारविषयीचा अधिकार त्यांना प्राप्त व्हावा, कामगार व त्यांच्या परिवाराची उपजिवीका सुरू रहावी ही जबाबदारी म्हणून कार्य करीत असतांना संबंधीत कामगारांना न्याय मिळत असल्याचे समाधान व आनंद असल्याची भावना यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केली. सदर बैठकीदरम्यान ज्या कामगारांचे वय ५२ वर्षे पेक्षा अधिक आहे व जे शारीरिकदृष्टया असमर्थ आहेत अशा कामगारांच्या कुटूंबातील शिक्षीत पाल्यांना १ महिन्याचे प्रशिक्षण देतांनाच त्यांना प्रशिक्षण भत्ता व नंतर रोजगारांत सामावुन घ्यावे असे निर्देश हंसराज अहीर यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले.  सन २०१४ पासून उद्योगाचे उत्पादन ठप्प असल्यापासूनची अंतिम देय राशी सर्व पात्र कामागारांना देण्याकरिता व्यवस्थापनाने त्वरीत सुयोग्य अहवाल तयार करून कामगारांना देय असलेली देणी प्रदान करण्याच्या सुचना अहीर यांनी बैठकीच्या माध्यमातून केल्या. बैठकीला संबोधीत करतांना अहीर यांनी स्थानिक शिक्षीत युवकांना रोजगारांत व कंत्राटात प्राधान्यक्रम द्यावे असे सुचित केले. बैठकीत कामगारहितैषी निर्णय झाल्याने उपस्थित कामगारांनी आनंद व्यक्त करीत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या संघर्षशील कार्याचे हे फलित असल्याने त्यांचेप्रती आभार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *