चंद्रपूर(का.प्र )दि.30 जून: राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 व रबी 2020- 21 हंगामापासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीचा पतपुरवठा यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ ही हेतू साध्य होण्यास मदत होईल हे या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के रबी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला.पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ,चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ,पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबी मुळे उत्पन्नात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ,नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान या प्रमुख बाबींचा मोबदला देण्याचा योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.
Related Articles
राज्यातील सीबीएसई शाळांमध्ये सुध्दा वर्ग १ ते ८ च्या विद्याथ्र्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेणार
चंद्रपूर (का.प्र.)सीबीएसई द्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्याथ्र्यांना परिक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारचे मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सीबीएसई शाळांमध्ये शिकणाèया विद्याथ्र्यांच्या पालकांच्या मागणीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्याची मागणी भारत सरकारच्यामानव संसाधन […]
आरोग्य शिबिराच्या पहिल्या दिवशी हजारो नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ 35 डॉक्टर आणि 55 वैद्यकीय कर्मचा-यांनी दिली सेवा…
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकाराने आयोजित आरोग्य शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन हजारो नागरिकांनी आज या शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरामध्ये सावंगी मेघे रुग्णालय, मनपा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्याकाय येथील आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील 35 डॉक्टर आणि 55 वैद्यकीय कर्मचा-यांनी सेवा दिली. आज सकाळी 9 वाजता या आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. यावेळी चंद्रपूर […]
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 16 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू
* गत 24 तासात 23 कोरोनामुक्त * आतापर्यंत 22,491 जणांची कोरोनावर मात * ॲक्टीव पॉझिटिव्ह 151 चंद्रपूर, दि. 28 : 23 जणांनी कोरनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 16 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 31 वर पोहोचली आहे. तसेच […]



