चंद्रपुर

मुंबई -पुणे येथून परतणाऱ्या नागरिकांनी शकुंतला लॉनवर प्राथमिक तपासणी करावी : मोहिते

Ø प्रत्येक तालुक्याला बसस्थानकावर व गावात आशा वर्कर मार्फत तपासणी

Ø चंद्रपूरमध्ये आतापर्यंत 1 हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी

चंद्रपूर, दि.18 मे : चंद्रपूर शहरात मुंबई-पुणे व अन्य शहरातून आगमन होत असलेल्या नागरिकांनी आपली सर्व प्रथम तपासणी व नोंद शकुंतला लॉन येथे करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात अन्य शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी संबंधित तालुक्याच्या बसस्थानकावर होत आहे तर गावपातळीवर आशा वर्कर कडून ही तपासणी होत आहे याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.