चंद्रपुर जिल्हा

२५०००/- रु. ची लाच घेतांना तलाठी अटकेत

ब्रम्हपुरी (ता. प्र)तक्रारदार हे मौजा ब्रम्हपुरी ता. ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून तक्रारदार यांचे खेड मक्ता येथील०.४३ हे.आर जमीनीवर पडलेल्या प्लॉटीगच्या कामासाठी व फेरफारसाठी अतकरे, तलाठी,यांनी ३० हजार रुपये लाच मागितली.

मात्र लाच म्हणून ३०,०००/-. देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी प्राप्त तक्रारीवरून दिनांक १८.०५.२०२० रोजी केळेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये तडजोडीअंती २५.०००/रु. लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने तहसिल कार्यालय, ब्रम्हपुरी येथे पंचासमक्ष केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी राजेद्र विठोबाजी अतकरे, तलाठी, कार्यालय साजा क्र ४खेड मक्ता ता.ब्रम्हूपरी जिल्हा चंद्रपूर यांना २५,०००/-रु. लाच रक्‍कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले

सदरची कार्यवाही ही श्रीमती रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक,ACBनागपुर, श्री.राजेश दुद्दलवार,अप्पर पोलीस अथिक्षक,ला प्र.वि.नागपुर तसेच पोलीस उपआधिक्षक, अविनाश भामरे,ला प्र वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात निळेश सुरडकर, तसेच कार्यालयीन स्टाफ ना. पो. का संतोष येलपूलवार, पो.कॉ,संदेश वाघमारे,नरेश नन्नावेरे व चालक राहुल ठाकरे यांनी यशस्वी पार पाडली.

यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किता त्यांच्या वतीने कोणी इसमलाचेची मागणी करीत असल्यास लाच-लुचपत “प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, अस आवाहनकरण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.