चंद्रपुर

चंद्रपूर शहर व पोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा येथून प्रत्येकी १ बाधित

   *चंद्रपूर बाधितांची संख्या १२३ वर*                                                                      *आतापर्यत ६२ कोरोनातून बरे*                                                                                    * ६१ बाधितांवर उपचार सुरू* चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमवारी सायंकाळी आणखी २ पॉझिटिव्ह बाधितांची भर पडली आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२३ वर गेली आहे.      नव्या २ बाधितांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या भिवापूर वार्ड परिसरातील ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे. हैदराबाद शहरातून ही महिला चंद्रपूरमध्ये आली होती. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव्ह आला आहे.    दुसरा बाधित हा करंजी येथील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील आहे. पोंभूर्णा तालुक्यातील मौदा येथील 21 वर्षीय तरुण संस्थात्मक अलगीकरणात होता. काल स्वॅब घेण्यात आल्यानंतर आज तो पॉझिटिव्ह ठरला आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह बाधितांची संख्या १२३ झाली आहे. आत्तापर्यंत ६२ जण कोरोना आजारातून बरे झाले असून ६१ संक्रमितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.