गडचिरोली

*गडचिरोलीजिल्हयात आज 9 कोरोनामुक्त तर 6 नवीन कोरोना बाधित*

गडचिरोली,(जिमाका)दि.17: जिल्हयात आज 9 जण कोरोनामुक्त झाले असून यामध्ये अहेरी तालुक्यातील 2, गडचिरोली येथील 6 यामध्ये एसआरपीएफ जवान 4 व स्थानिक 2, सिरोंचा येथील 1 असे एकूण 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 6 नवीन कोरोना बाधित त्यापैकी गडचिरोली येथील 3 पोलीस बाधित आढळून आले, चामोर्शी आष्टी येथील एक स्विपर व एक दैनंदिन स्वरूपात बँकेचे कलेक्शन करणारा कर्मचारी असे एकुण 2 बाधित मिळाले. सिरोंचा येथील एक जण बाधित मिळाला असे एकूण 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 137 झाली असून एकुण बाधित संख्या 849 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 711 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
****

Leave a Reply

Your email address will not be published.