घुग्घुस (प्रति): येथुन जवळच असलेल्या शेनगाव येथील राहणा-या सौ. वंदना परशुराम आत्राम (३५) हिने आज मंगळवारला सकाळी ६ वाजता दरम्यान राहते घरीच गळफास लावुन आत्महत्या केली. गावातील नागरिकांना हि माहिती मिळताच घुग्घुस पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले घुग्घुस पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी चंद्रपुर येथे पाठविले आहे घुग्घुस पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे. आत्महत्येचे कारण कळु शकले नाही पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
Related Articles
अंघोळीसाठी डोहात उतरलेल्या विध्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
गडचांदूर(ता.प्र): माणिकगड सिमेंट कंपनी च्या माईंनस जवळ असलेल्या नाल्या मध्ये मित्रांसोबत अंघोळीसाठी गेलेल्या 18 वर्षे वय असलेला विध्यार्थी स्वाभिक रामेश्वर प्रसाद याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी 1 च्या दरम्यान घडली,गडचांदूर येथील वार्ड न,5 मध्ये राहणारा हा विद्यार्थी मित्रांसोबत गोवारीगुडा जवळ असलेल्या माणिकगड कंपनी च्या खदानी जवळ असलेल्या नाल्या मध्ये आंघोळ करण्यास उतरल्यावर तो […]
महाकाली मंदिराच्या विकासकामाला पुरातत्व विभागाची मंजुरी मिळवुन द्या – आ. किशोर जोरगेवार
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष हंसराज अहीर यांची भेट घेत केली मागणी, नियुक्ती बदल दिल्या शुभेच्छा माता महाकाली मंदिराच्या ६० कोटी रुपयांच्या विकासकामाच्या निविदेला प्रशाकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर मंदिराच्या दुस-या टप्याच्या विकासकामासाठी ७५ कोटी रुपयांची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या दोनी कामाला एकत्रीतरित्या पूरातत्व विभागाची मंजुरी मिळवून देण्यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न […]
50 खाटांच्या रुग्णालयाला आता विशेष बाब म्हणून 100 खाटांची मान्यता
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश चंद्रपूर : जिल्ह्यात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याचीच फलश्रुती म्हणून मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले असून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आता विशेष बाब म्हणून 100 खाटांचे करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मुलमध्ये 50 […]



