
गडचिरोली,(जिमाका), दि.30*: वडसा येथील गांधी वार्ड मधील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याची नोंद आज जिल्हयात झाली. तसेच नवीन 107 जण कोरोना बाधित आढळले. तर 26 जण कोरोनामुक्त झाले. *नवीन 107 कोरोना बाधितामध्ये* : गडचिरोली येथील 34 जणांचा समावेश आहे. अहेरी येथील 9, आरमोरी येथील 7, चामोर्शी 7, कोरची येथील 3, कुरखेडा येथील 2, वडसा येथील 7, मुलचेरा येथील 2, एटापल्ली येथील 22, धानोरा येथील 12, भामरागड येथील 2 असे एकूण 107 जण कोरेानाबाधीत आढळून आले आहेत.नवीन बाधितांमध्ये अहेरी येथील 9 मध्ये शहरातील 7 तर महागावचे 2 जण आहेत. आरमोरीचे 7 यामध्ये शहरातील 3, थानेगाव 2 व वैरागडचे 2 जण आहेत. भामरागड शहरातील 2 जण बाधित आढळून आले आहेत. चामोर्शी 7 मध्ये आष्टी 2, शहर 3, येनापूर 1 व तळोधी 1 चा समावेश आहे. धानोरा 12 मध्ये शहर 2, मुरूमगाव 1 व 9 जण पोलीस स्टेशन गोदलवाहीचे आहेत. एटापल्ली मधील 22 मध्ये 15 शहरातील सीआरपीएफ आहेत व हेडरीचे ७ जण आहेत. गडचिरोली 34 मध्ये कन्नमवार वार्ड 2, आर्शिवाद नगर 1, खरपुंडी 1, सीआरपीएफ एमआयडीसी 1, आयोध्यानगर 2,



