
गडचिरोली( प्रति) : मुंबई येथून आलेल्या ३ (तीन ) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता पॉझिटिव्ह संख्या ३१ झाली आहे त्यापैकी ५ लोकांना दवाख्यान्यातून सुट्टी देण्यात आली असून सद्या २६ जणांवर उपचार सुरु आहे. नवीन रुग्ण हे मुलचेरा तालुक्यातील दोन तर अहेरी तालुक्यातील एक आहे. तीनही रुग्ण मुंबई येथून आले होते. नवीन तीनही रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात त्या त्या तालुक्यात ठेवण्यात आले होते. असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

