चंद्रपूर (का.प्र) महाराष्ट्रात व्यापारी केंद्र सरकारच्या हमी भावानुसार कापूस खरेदी न करता शेतकऱ्यांची लूट करत असल्याने सीसीआय द्वारे खरेदी कापूस केला जातो यावर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे नियंत्रण ठेवले जाते परंतु काही कृषि उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत होते टोकन पद्धतीशिवाय कापूस खरेदी केला जात नव्हता टोकन करिता अडवणूक करून पैसे वसुलीचा आरोप होत होता काही ठिकाणी अडत्यांचा कापूस खरेदीला प्राधान्य दिले जात होते प्रत्येक गाडीमागे ग्रेडर पैशाची मागणी करीत होते आज जवळपास ७० गाडी कापूस शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणला असता खरेदी बंद असल्याच्या सुचना देण्यात आल्या जीव घेण्यात उन्हात शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा होत होत्या बाजार समितीची अडवणूक कूपन प्रणाली यामुळे शेतकर्यांचा संयम सुटल्याने युवा शेतकऱ्यांनी सकाळी १० वाजता चंद्रपूर आदिलाबाद राज्यमार्ग रोखून धरून चक्काजाम आंदोलन सुरू केले दोन तास शेतकरी उन्हात आंदोलन करीत होता अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर विलास यामावर यांनी आंदोलना स्थळ गाठून शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या दबावाखाली टोकण पद्धती बाजूला ठेवून आज आलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहेत सीसीआय द्वारे तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.
Related Articles
आजचे कोरोना अपडेट
गत 24 तासात 960 कोरोनामुक्त, 234 पॉझिटिव्ह तर 13 मृत्यू आतापर्यंत 75,483 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 4,627 चंद्रपूर, दि.25 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 960 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 234 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 13 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची […]
राजुरा येथील दोन पोलीसच सापडले लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात
उपविभागीय पोलिस अधिकारी राजुरा कार्यालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या झडतीमधे वाहनातून 2,60,000 रुपयांची रोकड सुद्धा हस्तगत करण्यात आल्याची सुत्रांची माहीती आहे. राजुरा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षक व रायटरला ताब्यात घेतल्याची चर्चा असुन सदर यशस्वी कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपुर येथील […]
वाघडोह वाघाने गुरख्याला केले ठार
चंद्रपूर : ताडोबा जंगलातील वाघांची शान म्हणजे “वाघडोह” हा वाघ म्हातारा व अशक्त आहे मात्र म्हाताऱ्या वयात सुद्धा शिकार करीत गुरख्याला ठार केले. Tadoba big tiger attack शहराजवळील सिनाळा गावातील 65 वर्षीय दशरथ पेंदोर हा काल 20 मे ला गावालगत असलेल्या तलावाजवळ बकऱ्या चारण्यासाठी गेला होता, मात्र सायंकाळी गावात दशरथ परत न आल्याने नागरिकांनी शोधाशोध […]


