
चार मजूर गंभीर जखमी ,तर 16 किळकोळ जखमी
सर्व जणांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चिमुर
नेरीवरून जवळ असलेल्या खांबाडा गोंदेडा मार्गावर शेती च्या कामासाठी केवाडा येथील मजुरांना घेऊन जाणारी पीक अप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे पीक अप रस्त्याच्या बाजूला पलटली यात चार जणांना गंभीर दुखापत झाली असून सोळा जन किळकोळ जखमी झाले असून सर्वांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने जीवितहानी टळली सदर घटना आज दि 11 जुलै ला सकाळच्या सुमारास 9 वाजता दरम्यान घडली
सध्या शेतीच्या हंगामाला जोरदार सुरवात झाली असून मजूर वर्गाची कमतरता भासत असल्याने वाहनाने मजुरांची ने आन करून शेतीचे कामे पूर्ण केल्या जात आहे हा प्रकार तालुक्यातील सर्वच गावा मध्ये सुरू असून मजुरांची वाहतूक सुरू आहे सदर प्रकरणी केवाडा येथील 40 ते 50 मजुरांना पीक अप मध्ये घेऊन चिमूर जवळील येरखेडा येथील शेतात कामाला नेत असताना खांबाडा गावाच्या जवळच पीक अप MH 34 AV 1208 या क्रमांकाचा पीकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटला.या अपघातात 15 ते 20 मजूर किरकोळ जखमी तर चार मजूर गंभीर जखमी झाले सुदैवाने जीवितहानी झाली नाही सदर घटनेत जखमी मजुर व वाहन जागेवर सोडून वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.सदर अपघाताचा आवाज येताच बाजूला शेतात काम करणाऱ्या शेतकरी, मजूर व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी धाव घेत जखमीना पिकअप बाहेर काढले तसेच रुग्णवाहिका ला बोलावून गाडीतील सर्व जखमी मजुरांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी पाठविले.सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले चौकशी करून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.



