गडचिरोली(प्रति) : गडचिरोली जिल्हयात कोरोना प्रादुर्भाव कायम असून आज चामोर्शी व कुरखेडा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे . जिल्हयातील एकुण बाधित संख्या ६४ झाली असून आत्तापर्यंत ४६ डिस्चार्ज तर सक्रिय कोरोना बाधित १७. रुग्ण आहेत . कुरखेडा तालुक्यातील २२ वर्षीय युवक तर चामोर्शी तालुक्यातील २५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल आज पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी ६४ वर गेली आहे . . आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेले ४६ रुग्ण आहेत.




