गडचिरोली

पुरामुळे नागपूर- गडचिरोलीसह 9 मार्ग बंद,,

पुरामुळे नागपूर- गडचिरोलीसह 9 मार्ग बंद,, धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्हयात पुरपरिस्थीती
गडचिरोली :(प्रति): गडचिरोली जिल्हयात पावसाचा जोर नसला तरी धरणाच्या सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिल्हयात पुरपरिस्थीती निर्माण झाली असून आज 22 ऑगस्ट रोजी 9 प्रमुख मार्ग पुरामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प पडली आहे. बंद असलेल्या मार्गामध्ये पाल नदीमुळे नागपूर -गडचिरोली, गोविंदपूर नाल्यावरील पुरामुळे चामोर्शी- गडचिरोली मार्ग बंद झाला आहे. त्याचबरोबर आष्टी- गोंडपिपरी, पर्लकोटा नदीच्या पुरामुळे आलापल्ली- भामरागड, सोपनपल्ली – असरअल्ली, हेमलकसा- सुरजागड, कसनसून- भामरागड, रोमपल्ली -झिंगानूर, अहेरी- बेजुरपल्ली या मार्गाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.