गडचिरोली

*गडचिरोली जिल्ह्यात 74 कोरोना बाधित* **104 कोरोनमुक्त*

गडचिरोली (प्रति ):जिल्हयात मागील चोवीस तासात सक्रिय रूग्णांपैकी 104 जण कोरोनामुक्त झाले तर पुन्हा 74 जणांची नव्याने कोरोना बाधित म्हणून नोंद झाली.नवीन 74 कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 36 जण आढळून आले. यात मोरेश्वर पेट्रोल पंपाजवळ 1, सीआरपीएफ 2, कोटगल 1 सोनापूर संकूल 2, कॅम्प एरिया 3, गांधी वार्ड 2, रामपुरी वार्ड 1, लांझेडा 3, सर्वोदय वार्ड 1, साई नगर 4, इतर जिल्हयातील 6, पोलीस कॉलनी 1, नवेगाव 2, आशिर्वाद नगर 1, गोकुळनगर 1, अनमोल नगर 1, सी 60 कार्यालय 1, शहरातील इतर ठिकाणचे 3 यांचा समावेश आहे.आरमोरी 11 मध्ये शहरातील 9 , 1 आलापल्ली येथील व 1 डोंगरगावचा आहे. चामोर्शी 6 मधील 3 शहरातील, तळोधी, तेलंग व कुनघाडा येथील एक एक जणाचा समावेश आहे. धानोरा 4 मध्ये शहरातील 2, लेखा 1, मुरमगाव 1 यांचा समावेश आहे. एटापल्ली 9 मध्ये शहरातील 3, हेडरी 3, सीआरपीएफ 3 यांचा समावेश आहे. कुरखेडा 1 जण गोठणगावचा आहे तर मुलचेरा शहरातील 1 जण बाधित मिळाला आहे. वडसा येथील 6 मध्ये कुरूड 2, जुनी वडसा 2, पटेल वार्ड 1, सीआरपीएफ 1 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.