चंद्रपुर जिल्हा

अवैद्य रेतीचोरांचे धाबे दणाणले

घुग्गुस (ता . प्र ): घुग्गुस जवळील चिंचोली रेतीघाटावर अचानकपणे धाड टाकून रेती चोरी करणाऱ्या सहा रेती तस्करांना पकडले. हि कारवाही चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड यांनी केली यासाठी तहसिलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून हि धाड आज सकाळी ७:३० वा . च्या सुमारास टाकली त्यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली यामध्ये नुसल हसन सिद्दीकी यांचे २, जुल्फेकर रशीद अहमद१,नत्थू विष्णू घोडके १, गुणवंत महादेव गोरडे १, असे एकूण सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले यावेळी ट्रॅक्टर धारकांकडून १ लाख ५० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *