चंद्रपुर

चंद्रपूरमध्ये लॉकडाऊन 3.0 ‘जैसे थे ‘ केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह : जिल्हाधिकारी

✨ पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील 46 लोकांची संपर्क सूची तयार
✨ जवळच्या दहा लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले
✨ पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर ; दर तासाला आढावा
✨ यापूर्वी ज्यांना परवानगी आहे ते दुकाने उघडली जातील
✨ कन्टेनमेंट झोनमध्ये जाण्या येण्याची १४ दिवस परवानगी नाही
✨ बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येकाला कॉरेन्टाइन होणे आवश्यक
✨ सरकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू होण्याचे निर्देश
चंद्रपूर दि. ४ मे : चंद्रपूरमध्ये केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे. या रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याच्या संपर्कात आलेल्या ४६ लोकांची संपर्क सूची करण्यात आली आहे. संशयित 10 स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून कंटेनमेंट झोनमध्ये पुढील 14 दिवस सर्वांना येणे-जाणे बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यांमधील लॉक डाऊन कायम असून जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही नव्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.
आज दुपारी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये जिल्हा प्रशासनातील प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती घेतल्याशिवाय समाज माध्यमांवर कोणतेही वृत्त प्रसारित करू नये, अपप्रचार होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी सूचना केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *