
घुग्घुस (प्रति)घुग्घुस येथून पाच किमी अंतरावर असलेल्या शेनगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार प्रकाश परदेशी हे काही वर्षापासून गरीब जनतेची फसवणूक करीत होते. याबाबत येथील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु याकडे प्रशासनानी दुर्लक्ष केल्यामुळे दुकानदाराची हिंमत वाढत गेली. सध्या सरकारी स्वस्त धान्य दुकानातील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत तांदूळ प्रति व्यक्ती पाच किलो वाटप करण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकानात दिले असून हा दुकानदारकुटूंबातील सहा व्यक्तीला तीन किलो व चार व्यक्तीला दोन किलो तांदूळ देत असल्यामुळे येथील नागरिकांनी घुग्घुस युवा सेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे यांचेकडे तक्रार केली.
त्यांनी परदेशी यांच्या स्वस्त धान्य दुकानावर पाळत ठेऊन हि माहिती चंद्रपूर येथील धान्य पुरवठा अधिकारी भारत तुंबडे यांना माहिती दिली असता त्यांनी शेणगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानात धाड टाकून पाच किलो गहू व चोवीस किलो तांदूळ जब्त करून दुकानाला सील ठोकले यावेळी युवा सेना चेतन बोबडे, शिवसेना उपशहर प्रमुख योगेश भांदक्कर , शिवसैनिक विजु मत्ते व विजु तिखट व सर्व गावकरी उपस्थितीत होते.



