घुग्घुस (प्रति): येथुन जवळच असलेल्या शेनगाव येथील राहणा-या सौ. वंदना परशुराम आत्राम (३५) हिने आज मंगळवारला सकाळी ६ वाजता दरम्यान राहते घरीच गळफास लावुन आत्महत्या केली. गावातील नागरिकांना हि माहिती मिळताच घुग्घुस पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले घुग्घुस पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी चंद्रपुर येथे पाठविले आहे घुग्घुस पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे. आत्महत्येचे कारण कळु शकले नाही पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
Related Articles
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ५ मराठी चित्रपटांची निवड
पोटरा , तिचं शहर होणं , पांडीचेरी , राख आणि पल्याड सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा चंद्रपूर – गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट Goa Film २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा , तिचं शहर होणं , पांडीचेरी , राख आणि चंद्रपूरची निर्मिती असलेल्या पल्याड […]
प्रयत्नवादी बनून यशाचे शिखर गाठा – आ. किशोर जोरगेवार
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रत्येक गुणवंत विद्यार्थी समाजाच्या कामात आला पाहिजे. त्याने स्व:ताचे आणि पर्यायाने जिल्ह्याचे नाव देशात लौकिक करावे. शिक्षणातून पिढीचे कल्याण होते. आजच युग स्पर्धेचं असुन यात टिकुन राहयच असेल तर प्रयत्नात सातत्य ठेवा. नशिबाला किंवा परिस्थितीला दोष न देता प्रयत्नवादी बनुन यशाचे शिखर गाठा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार […]
चंद्रपूर वनविभागातील महिला वनरक्षकाला खाजगी व्यक्तीमार्फत लाच स्वीकारताना अटक
वन जमिनीवर वृक्ष लागवड न करण्यासाठी महिला वनरक्षक यांनी शेतकऱ्याला 10 हजार रुपयांची लाच मागितली, सदर प्रकरणाची पडताळणी केल्यावर चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वनरक्षकाला खाजगी इसमामार्फत लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. तक्रारदार हे मौजा उपरी तहसील सावली येथील रहिवासी असून ते शेतीचा व्यवसाय करतात, तक्रारदार यांच्या वडिलांनी वर्ष 1982 मध्ये मौजा कापसी […]



