चंद्रपूर (का . प्र ): लॉकडाउन २ दि . ३ रोजी संपल्यानंतर जिल्लाधिकाराच्या सूचनांनुसार विद्यार्थी व मजुरांना आपआपल्या गावाकडे जाण्याची परवानगी दिल्यामुळे विद्यार्थी व मजुरांची ई पास व मेडिकल तपासणीसाठी एकच झुंबड सरकारी दवाखान्यात उडाली होती हे विद्यार्थी व मजूर आपआपल्या टू व्हीलरनेच गावाकडे जायला निघाले होते तत्पूर्वी मेडिकल तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात आज ७०० जणांनी तपासणी केली व जाण्यास तयार झाले लॉकडाउनमुळे अडकल्यामुळे विद्यार्थी व मजूर घरापासून दूर राहत असल्यामुळे आज ते घरी जाण्यास आतुर झाले होते तरी प्रशासनाने काही गरजवंतांना राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली होती . पण बेरोजगारीमुळे मजूर चिंतीत झाले होते. व गावाकडे जाण्यास उत्सुक होते त्यामुळेच मेडिकल तपासणीसाठी एकच झुंबड सरकारी दवाखान्यात झाली होती
Related Articles
नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ‘स्टार्टअप’ एक चांगले व्यासपीठ
रुजू होताच नुतन जिल्हाधिका-यांचे नवउद्योजकांना मार्गदर्शन चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोबर : केंद्र व राज्य सरकारने देश, राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजकांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे. आपल्यातील कौशल्याचा परिपूर्ण उपयोग करून नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ‘स्टार्टअप’ एक चांगले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन नुतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कौशल्य, रोजगार, उद्योजगता व […]
इको-प्रो ची जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचेकडे मागणी….
चंदीगडच्या धर्तीवर चंद्रपूर शहरात उभारावे ‘एअर प्युरीफायर टॉवर’ खनिज विकास निधीमधुन शहरातील पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न करण्याची मागणी चंद्रपूर: चंद्रपूर शहरातिल हवा प्रदुषणावर नियत्रंण आणण्यास चंदीगडच्या धर्तीवर शहरात ‘एअर प्युरीफायर टॉवर’ खनिज विकास निधीमधुन उभारण्याची मागणी इको-प्रो कडुन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचेकडे एका निवेदनातुन केली आहे. शहरातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रदुषण नियंत्रण विषयक व्यापक उपाययोजना, सर्वच […]
चिमूर क्रांती व बलिदानाचा इतिहास अजरामर राहणार – आ. वडेट्टीवार
भारत देशात व्यापारी म्हणून येऊन जातीय तीळ निर्माण करून देशाची सूत्रे हाती घेणारे इंग्रजांनी राज्यकर्ते म्हणून प्रचंड प्रमाणात नागरिकांवर अन्याय अत्याचार केले. इंग्रजांच्या विशाल फौजफाट्यासमोर आव्हान देणाऱ्या बलिदानी क्रांतिकार्यांनी स्वातंत्र्य चळवळीची मुहूर्तमेढ केली. स्वातंत्र्याच्या या इतिहासात चिमूर क्रांतीची सुवर्ण अक्षरांनी नोंद असून चिमूर क्रांती व बलिदानाचा इतिहास अजरामर राहणार असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, […]



