गडचिरोली (प्रति ) : जिल्हयात काल रात्री उशिरा 23 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह मिळाले.यातील सर्व व्यक्ती बाहेरील जिल्हा व राज्यातील आहेत, यामध्ये गडचिरोली जिल्हयातील एकही व्यक्ती नाही. यामध्ये 22 जवान सीआरपीएफ बटालियनचे आहेत व 1 व्यक्ती भंडारा जिल्हयातील असून नोकरीत रूजू होण्यासाठी भामरागड येथे दाखल झाला होता. यातील सर्व 23 ही व्यक्ती पुरूष आहेत. सर्वांना जिल्हयात आल्यानंतर यामध्ये सीआरपीएफला कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे तर भामरागड येथील एका व्यक्तीला भामरागडमध्येच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी सर्वच रूग्ण बाहेरील राज्य व जिल्हयातील असल्यामुळे त्यांच्या नोंदी त्या त्या जिल्हयात तसेच राज्यात करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंतची एकुण बाधित संख्या ७३च राहणार आहे. सदर रुग्णांच्या नोंदी पोर्टल वर सायंकाळपर्यंत राज्य स्तरावरून त्या त्या ठिकाणी अपडेट केल्या जाणार आहेत. २३ पैकी ७ नोंदी राज्य स्तरावरून मंजूर झाल्याने त्या त्या जिल्हयात शिफ्ट केलेल्या आहेत. उर्वरीत नोंदी शिफ्ट करणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
Related Articles
आज सकाळपासून एकूण १६ जणांचे कोरोना निदान*
*गडचिरोली*: संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या कुरखेडा येथील आणखी ६ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले. यामध्ये १ महिला व ५ पुरुषांचा समावेश आहे. नागपूर, भंडारा व अमरावती येथून आलेल्या या ६ लोकांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह मिळाले. तसेच चामोर्शी येथील १ जण हैद्राबाद येथून स्वगावी आला होता. त्याला चामोर्शी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच अहेरी […]
गडचिरोलीत जिल्हयात दोन मृत्यूसह; 118 नवीन बाधित
* तर 137 कोरोनामुक्त* *गडचिरोली,(जिमाका),दि.29*: कोरोनामुळे दोन मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5651 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4709 वर पोहचली. तसेच सद्या 885 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 57 जणांचा मृत्यू कोरोनामुळे […]
गडचिरोली जिल्ह्यात आज नवीन 107 कोरोना बाधित
*एका मृत्यूसह जिल्ह्यात आज नवीन 107 कोरोना बाधित *तर 26 जण कोरानामुक्त* गडचिरोली,(जिमाका), दि.30*: वडसा येथील गांधी वार्ड मधील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याची नोंद आज जिल्हयात झाली. तसेच नवीन 107 जण कोरोना बाधित आढळले. तर 26 जण कोरोनामुक्त झाले. *नवीन 107 कोरोना बाधितामध्ये* : गडचिरोली येथील 34 जणांचा समावेश आहे. अहेरी येथील 9, […]


