दिनांक ०६ मे २०२० रोजी रात्री दरम्यान माणिकगड गडचांदूर जिल्हा चंद्रपूर येथे नांदेड येथून आलेल्या तीन नागरिकांना संशयावरून जिल्हा प्रशासन व पोलिसाचे मदतीने ताब्यात घेतले होते. पोलीस व कोव्हीड १९ नियंत्रण कक्ष प्रशासनाच्या वतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसांसोबत संपर्क केला असता चंद्रपूर येथील ताब्यात घेतलेले तीन इसमांचे नावे हि नांदेड येथून पसार झालेल्या इसमांसोबत मिळ्तेजुळते नसल्याची माहिती मिळाली. तरीही पुढील खबरदारी म्हणून नांदेड येथील पथक हे अँब्युलन्ससह चंद्रपूर येथे येवून माणिकगड येथून ताब्यात घेतलेल्या नांदेड येथील तिन्ही नागरिकांना घेऊन पुढील तपासणी व पडताळणी साठी नांदेड येथे रवाना झाले.
Related Articles
आ.किशोर जोरगेवार येणार का शिवसैनिकांच्या निशाण्यावर….
दोन दिवसांपासून होताहेत समाज माध्यमांवर ट्रोल महाविकास आघाडीची साथ सोडून थेट गुवाहाटी गाठून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ह्यांना साथ देणारे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार ह्यांना चंद्रपूर पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा पुरविली असल्याचे कळले आहे. मागील अडीच वर्षांपासून ठाकरे सरकारला पाठिंबा देणाऱ्या किशोर जोरगेवार ह्यांनी अचानक एकनाथ शिंदे गटाला समर्थन जाहीर करून थेट गुवाहाटी गाठले. त्यानंतर […]
गांधी कुटुंबाला त्रास देणे निंदणीय
खासदार बाळू धानोरकर यांचा आरोप केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आंदोलन चंद्रपूर : देशासाठी गांधी कुटुंबाने त्याग केला आहे. बलिदान दिले आहे. त्या कुटुंबाला केंद्र सरकार त्रास देत आहे. हा प्रकार निंदणीय आणि तेवढाच संतापजनक आहे. ईडीच्या माध्यमातून चौकशीच्या नावावर सुरू असलेल्या प्रकाराविरोधात देशभर संताप व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने […]
चंद्रपूर: उन्हाचा परिणाम सिंचन प्रकल्प व तलावातील पाणी केवळ २८ टक्के शिल्लक
चंद्रपूर यावर्षी उन्हाळा चांगलाच तापणार असल्याचा तथा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. उन्हाचा परिणाम सिंचन प्रकल्प व तलावातील पाणी केवळ २८ टक्के शिल्लक राहिले आहे. त्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे. यंदा चांगला पाऊस होऊनही जिल्ह्यातील […]



