दिनांक ०६ मे २०२० रोजी रात्री दरम्यान माणिकगड गडचांदूर जिल्हा चंद्रपूर येथे नांदेड येथून आलेल्या तीन नागरिकांना संशयावरून जिल्हा प्रशासन व पोलिसाचे मदतीने ताब्यात घेतले होते. पोलीस व कोव्हीड १९ नियंत्रण कक्ष प्रशासनाच्या वतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसांसोबत संपर्क केला असता चंद्रपूर येथील ताब्यात घेतलेले तीन इसमांचे नावे हि नांदेड येथून पसार झालेल्या इसमांसोबत मिळ्तेजुळते नसल्याची माहिती मिळाली. तरीही पुढील खबरदारी म्हणून नांदेड येथील पथक हे अँब्युलन्ससह चंद्रपूर येथे येवून माणिकगड येथून ताब्यात घेतलेल्या नांदेड येथील तिन्ही नागरिकांना घेऊन पुढील तपासणी व पडताळणी साठी नांदेड येथे रवाना झाले.
Related Articles
चंद्रपूर येथील 32 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला.
चंद्रपूर – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील 32 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला.7 ऑगस्टला त्या डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता नंतर 12 ऑगस्टला त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 11 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.त्यांच्या मृत्यूने वैधकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे, जिल्ह्यात आज […]
*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश*
चंद्रपूर : जातीच्या दाखल्याविना कोणतेही काम होत नव्हते. अखेर महसूल विभागाच्या वतीने कार्यक्रम घेत त्यात भद्रावती तालुक्यातील १०० टक्के लोकांना जातप्रमाणपत्रासह इतर लोकांना विविध दाखले देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष भद्रावती अनिल धानोरकर, उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार भद्रावती सोनवणे, मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती पिदूरकर, सुधीर मुळेवार, […]
*अवैद्य दारू विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करावी. पिंपरी दीक्षित महिलांचा एल्गार*
अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीकरीता, पिपरी दिक्षीत येथील ग्रामस्थांनी आज पोलिस स्टेशनवर धडक दिल्याने, प्रशासनात खळबळ माजली. मागील अनेक वर्षापासून तालुक्यात अवैद्य दारू विक्री केली जात असल्यांने, महिलांमद्ये संताप व्यक्त केला जात आहे. या अवैदय दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून, लहान मुलेही दारूच्या आहारी जात आहे. यामधे शाळा कॉलेजच्या तरुण पिढीचा समावेश आहे. […]


