चंद्रपुर जिल्हा

जुगार खेळणाऱ्या ९ आरोपीना अटक

राजुरा (प्रती)काल दिनांक 27 मे 2020 रोजी येथिल गढी वॉर्ड मधिल एका घरात जुगार खेळल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने राजुऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव ह्यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह धाड घालुन जुगार खेळताना 9 व्यक्तींना रंगेहात अटक केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अमोल नागपुरे, प्रशांत गेडाम, परवेझ जावेद शेख, घनश्याम पूरटकर, उमेश गोरे, शिवकुमार विधाते, मनोहर कुकडे, राजु मोहूर्ले, प्रकाश शेंडे ह्या 9 आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.
राजुरा शहरात अनेक ठिकाणी जुगार खेळल्या जात असल्याची चर्चा असुन भारत चौक परिसरातील नगर पालिकेचा बगीचा, रमाबाई नगर येथिल पाण्याची टाकी, सोमनाथपूर वॉर्ड, बेघर वस्ती ईत्यादी मुख्य ठिकाणे असल्याचे कळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.