चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मनसे सैनिकांची शपथपत्र मोहीम

चंद्रपुर :- आम्ही आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ आहोत व पुढेही राहणार असे हमीपत्र शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांना दिले त्याच धर्तीवर चंद्रपुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वाखाली शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर आम्ही मनसे सोबत एकनिष्ठ होतो आणि राहणार अश्या आशयाचा मजकूर लिहून शपथपत्र लिहिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपुर दौऱ्यावर आले असता मनसेच्या काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अश्या प्रकारची मोहीम राबविण्याची मागणी केली होती त्यावर राज ठाकरे यांनी शपथपत्र मोहीम राबविण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. त्या अनुषंगाने आज चंद्रपुरातील मनसे नेते मनदीप रोडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शपथपत्र लिहिले. अश्या प्रकारचे कार्यकर्त्यांद्वारे शपथपत्र भरून देणारा चंद्रपुर जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.