चंद्रपूर(का.प्र):दि.१९ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करीत असलेल्या अन्य राज्यातील मजुरांना आपल्या गावी,आपल्या राज्यात, परत जायचे असेल तर त्यांनी आपल्या नावाची नोंद संबंधित वेबसाईट वर करावी, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सध्या काम करत असलेल्या अन्य राज्यातील मजुरांना आपल्या स्वतःच्या राज्यात परत जायचे, असेल तर त्यांनी आपली नोंद https://migrant.mahabocw.in/migrant/form या वेबसाईटवर करण्याचे,आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.मायग्रंट फॉर्म नावाची ही वेबसाईट असून https://migrant.mahabocw.in/migrant/form यावर आपल्या नावाची नोंद करणे आवश्यक आहे.ज्या ठिकाणी अन्य राज्यातील कामगार कार्यरत असतील त्या आस्थापनाच्या प्रमुखांनी देखील कामगारांना या साठी मदत करावी, असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.
Related Articles
चंद्रपूर शहर स्वच्छ करण्यात सामाजिक संघटनांनी घेतलेला पूढाकार कौतुकास्पद – आ. किशोर जोरगेवार
महानगर पालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेत योग नृत्य परिवाराचा सहभाग, आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली उपक्रमाला भेट. महानगर पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जात असलेल्या संयुक्त स्वच्छता अभियानात विविध सामाजिक संघटनांनी पूढाकार घेत शहर स्वच्छ व सुंदर करण्याची मोहिम हाती घेतली आहे. योग नृत्य परिवारानेही यात घेतलेला सक्रिय सहभाग महानगर पालिकेच्या या अभियानाला हातभार लावणारा असुन आपले […]
चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट्स
*आज जिल्ह्यात एकण २७९ नवीन कोरोनाबाधित * *जिल्ह्यात एकूण ३४४६ कोरोनाबाधित *आतापर्यंत बरे झालेल्याची संख्या १६०८ *आतापर्यंत मृत्यू झालेल्याची संख्या ३३ बाहेरील ४ *जिल्ह्यात कोरोनाची साखळी सुरूच *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा *घरी रहा,सुरक्षित रहा
एमपीएससीतून चंद्रपूरची सायली ठोंबरे बनली सहायक अभियंता …
चंद्रपूर : सायली दिगंबर ठोंबरे हिने एमपीएससी सिव्हिल सर्व्हिस अभियांत्रिकी २०१९ च्या स्पर्धा परीक्षेत जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-२ पदाच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवले आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर आपण पुढे जाऊ शकतो, हे तिने यातून दाखवून दिले आहे.



