उपमूख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा चंद्रपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना दिक्षा दिली. त्यामूळे चंद्रपूरशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते जूळल्या गेले असून याची ईतिहासातही दखल घेण्यात आली आहे. मात्र त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारे एकही वास्तू चंद्रपूरात नाही. त्यामुळे युवा पिढीला त्यांच्या देशासाठीच्या योगदानाची माहिती देणारे संविधानारावर आधारीत अद्यावत संविधान भवन चंद्रपूरात उभारण्यात यावे अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी केली असून सदर मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थ – नियोजन मंत्री अजितदादा पवार यांना दिले आहे.काल मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात आ. जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री अजीतपवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चंद्रपूरात संविधानाच्या माहितीवर आधारीत संविधान भवन निर्मीतीच्या मागणी संदर्भात चर्चा केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली या ठिकाणी बौध्द धम्माची दिक्षा दिली. त्यामुळे येथील पावण दिक्षाभूमीवर भारतासह जगाच्या कानाकोप-यातुन लाखो बौद्ध उपासक – उपासिका, भिक्षू संघ मोठ्या संख्येने येतात परंतु आज इतके वर्ष लोटूनही या दिक्षाभूमीचा अपेक्षीत असा विकास झालेला नाही. त्यामुळे याच्या विकासासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची माहिती आणि पर्यायाणे संविधानीक हक्कांबाबत चंद्रपूरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच बाहेरुन येणा-या नागरिकांनाही डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या विषयी जाणून घेणे सहज व्हावे याकरिता चंद्रपूर शहरात संविधानावर आधारित संपूर्ण माहिती असलेले अद्यावत संविधान भवन उभारण्यात यावे अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी ना. अजीतदादा पवार यांना केली आहे. तसे पत्रही आ. जोरगेवार यांच्या वतीने त्यांना देण्यात आले आहे. अजित पवार यांनीही यावेळी आ. जोरगेवार यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या कामाबद्दल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून माहिती घेवून सदर मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
Related Articles
12 तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा शून्यावर 24 तासात 39 कोरोनामुक्त, 7 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु
चंद्रपूर,दि. 22 जून : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असून जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी तब्बल 12 तालुक्यात मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात जिल्ह्यात 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर सात जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच एका बाधिताचा जिल्हयात मृत्यू […]
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 86 पॉझिटिव्ह
* गत 24 तासात 42 कोरोनामुक्त * आतापर्यंत 23,170 जणांची कोरोनावर मात * ॲक्टीव पॉझिटिव्ह 632 चंद्रपूर, दि. 7 मार्च : 42 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 86 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 202 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या […]
*चंद्रपूर जिल्ह्यातील आता बाधितांची संख्या १२५ वर*
चंद्रपूर (का.प्र ):चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री उशिरापर्यंत एकूण ७ पॉझिटिव्ह बाधितांची भर पडली आहे. यामध्ये ३ राज्य राखीव पोलीस दलाचे जवान ( एसआरपीएफ ) आहेत. ते पुणे येथील मूळ निवासी आहेत. त्यामुळे त्यांची चंद्रपूरच्या बाधितांमध्ये गणना होणार नाही. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह असला तरी कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या […]



