चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 86 पॉझिटिव्ह

* गत 24 तासात 42 कोरोनामुक्त

* आतापर्यंत 23,170 जणांची कोरोनावर मात

* ॲक्टीव पॉझिटिव्ह 632 

चंद्रपूर, दि. 7 मार्च : 42 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 86 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 202 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 170 झाली आहे. सध्या 632 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 22 हजार 583 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 96 हजार 244 नमुने निगेटीव्ह आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत 400 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 362, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधीत आलेल्या 86 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 19, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपूर तीन, भद्रावती पाच, ब्रम्हपुरी तीन, सिंदेवाही दोन, मुल 10, राजूरा एक, वरोरा 40 व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *