गडचिरोली

*गडचिरोली जिल्हयात आज 51 नवीन बाधित, तर 110 कोरोनामुक्त

*गडचिरोली,(जिमाका),दि.31*: आज जिल्हयात 51 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 110 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5817 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4916 वर पोहचली. तसेच सद्या 844 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 57 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.51 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.51 टक्के तर मृत्यू दर 0.98 टक्के झाला. नवीन 51 बाधितांमध्ये गडचिरोली 26, अहेरी 3, आरमोरी 3, भामरागड 5, चामोर्शी 2, धानोरा 2, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 7 जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 110 रूग्णांमध्ये गडचिरोली 48, अहेरी 16, आरमोरी 10, भामरागड 2, चामोर्शी 8, धानोरा 1, एटापल्ली 4, मुलचेरा 5, सिरोंचा 10, कोरची 1, कुरखेडा 2 व वडसा मधील 3 जणांचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील नवेगाव ३, पोलीस स्टेशनमागे १, चामोर्शी रोड १, आयटीआय चौक २, रेव्हून्यू कॉलनी २, आयोध्यानगर, कलेक्टर कॉलनी, कॅम्प एरिया प्रत्येकी एक एक, गोंडवाना विद्यापीठ रस्ता २, गांधी वार्ड १, गोकूळनगर १, हनुमान वार्ड १, खरपुंडी १, मेडिकल कॉलनी १, मौशीखाम १, एलआयसी कॉलनी २, पंचवटीनगर १, साईनगर १, साखरा १ व सुयोगनगर १ जणाचा समावेश आहे. अहेरी मध्ये स्थानिक १, आलापल्ली व कन्नेपल्ली एक एक जणाचा समावेश आहे. आरमोरी २ स्थानिक व १ वैरागड, भामरागड १ ताडगाव व इतर स्थानिक, चामोर्शी १ स्थानिक व १ आष्टीमधील आहे. धानोरा २ जण सिंदेसूर मुरूमगाव चे आहेत. एटापल्ली २ स्थानिक आहेत. कुरखेडा १ स्थानिक तर वडसा मधील कोरेगाव ४ विसोरा २ व स्थानिक १ जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.