चंद्रपूर(का.प्र ):दिनांक १०. ०६ . २०२० रोजी मोहर्ली (बफर )वनपरिक्षेत्रातील सीतारामपेठ बीटातील संरक्षित वन कक्ष क्र. ९५६ च्या नाल्यामध्ये वाघिणीचा मृतदेह आढळून आला. तसेच त्या भागाची अधिकची पाहणी केली असता. १४.०६. २०२० रोजी आणखी वाघिणीच्या पिल्लाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. प्राथमिक दृष्ट्या वाघीण व दोन पिल्लांचा मृत्यू विषप्रयोगमुळे झाल्याच्या संशयावरून तपास केला असता. लगतच्या कोंडेगाव गावातील तीन आरोपी नामे १)सूर्यभान गोविंद ठाकरे वय-६० २)श्रावण श्रीराम मडावी वय -४७ ३)नरेंद्र पुंडलिक दडमल वय -४९ यांना सदर गुन्हच्या अनुषंगाने चौकशी साठी ताब्यात घेतले असून चौकशी केली असता त्यांनी गुहन्याने कबुली दिली. सर्व आरोपी हे कोंडेगाव शेतशिवारात मोह दारू काढण्याचे काम करतात दारू काढून निघालेल्या सडव्यावर डुक्कर मारण्याच्या उद्धेशाने थिमेट टाकले सदर परिसरात वाघाचा वावर असल्याने वाघा पासून आपला दारूचा धंदा बंद पडू नये मेलेल्या डुकरावरती आणखी विष प्रयोग करून वाघीण व दोन पिल्ले यांना मारण्यात आले. आरोपीचे ब्यान नोंदवून अटक करण्यात आली पुढील तपास सुरु आहे.
Related Articles
बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण अनिवार्य
उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 42; 56 बाधित कोरोना मुक्तØ एकूण बाधितांची संख्या 98 Ø आतापर्यंत जिल्ह्यात 84 हजारावर नागरिक दाखल Ø संस्थात्मक अलगीकरणात 943 नागरिक Ø गृहअलगीकरणात 2 हजारावर नागरिक Ø 81 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण Ø सध्या 14 कंटेनमेंट झोन कार्यरत चंद्रपूर, दि. 2 जूलै: जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण अनिवार्य […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
जिल्ह्यात गेल्या २४ तासात १३७ जण कोरोना बाधित तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मृत्यू जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१३०८२ आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८८३ सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -३००२ आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -१९७ जिल्ह्यातील (१८८) बाहेरील (९) जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे. अत्यावश्यक […]


