चंद्रपूर(का.प्र ):दिनांक १०. ०६ . २०२० रोजी मोहर्ली (बफर )वनपरिक्षेत्रातील सीतारामपेठ बीटातील संरक्षित वन कक्ष क्र. ९५६ च्या नाल्यामध्ये वाघिणीचा मृतदेह आढळून आला. तसेच त्या भागाची अधिकची पाहणी केली असता. १४.०६. २०२० रोजी आणखी वाघिणीच्या पिल्लाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. प्राथमिक दृष्ट्या वाघीण व दोन पिल्लांचा मृत्यू विषप्रयोगमुळे झाल्याच्या संशयावरून तपास केला असता. लगतच्या कोंडेगाव गावातील तीन आरोपी नामे १)सूर्यभान गोविंद ठाकरे वय-६० २)श्रावण श्रीराम मडावी वय -४७ ३)नरेंद्र पुंडलिक दडमल वय -४९ यांना सदर गुन्हच्या अनुषंगाने चौकशी साठी ताब्यात घेतले असून चौकशी केली असता त्यांनी गुहन्याने कबुली दिली. सर्व आरोपी हे कोंडेगाव शेतशिवारात मोह दारू काढण्याचे काम करतात दारू काढून निघालेल्या सडव्यावर डुक्कर मारण्याच्या उद्धेशाने थिमेट टाकले सदर परिसरात वाघाचा वावर असल्याने वाघा पासून आपला दारूचा धंदा बंद पडू नये मेलेल्या डुकरावरती आणखी विष प्रयोग करून वाघीण व दोन पिल्ले यांना मारण्यात आले. आरोपीचे ब्यान नोंदवून अटक करण्यात आली पुढील तपास सुरु आहे.
Related Articles
साठेबाजीवर आळा घालत कबड्डी आणि पंगा हे कापसाचे वाण शेतक-यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करा – आ. किशोर जोरगेवार
जिल्हाधिकारी यांची भेट घेत केली मागणी कबड्डी आणि पंगा हे कापसाचे वाण एका दिवसात बाजारपेठेतुन बेपत्ता झाले असुन 800 रुपये प्रति बोरीचे हे वाण 1300 ते 1400 रुपयात शेतक-यांना विकल्या जात असल्याचा प्रकार आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या लक्षात आणून दिला असुन या सदर साठेबाजीवर आळा घालुन कबड्डी आणि पंगा हे कापसाचे वाण शेतक-यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन […]
आता शहर पोलीस ठाण्यात कोरोनाची एन्ट्री
जिल्ह्यात कोरोना विरूध्द लढणाऱ्या यंत्रणामधील कोरोना योध्दांना कोरोना व्हायरसने आपल्या कवेत घेत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसाआधी चंद्रपूर महानगर पालिकेतील कर्मचारी कोरोना बाधित झाल्याची घटना ताजी असतांनाच आज दि. २७ जुलैला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबल देखील कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाले आहे. चंद्रपूर शहरात सर्वसामान्यांना कोरोना पासून दूर […]
‘‘हर घर तिरंगा’’ हा कार्यक्रम राबविणे हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण – आ. मुनगंटीवार
आ. मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथे घेतला कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा. देशगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतुन हर घर तिरंगा ही योजना संपूर्ण देशभर राबविण्याचे ठरले आहे. ही योजना चंद्रपूर जिल्हयात सुध्दा पूर्ण शक्तीने यशस्वी करावयाची आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बल्लारपूर येथे घेतलेल्या बैठकीत बोलताना केल. यावेळी आ. मुनगंटीवार […]



