चंद्रपूर(का.प्र ):दिनांक १०. ०६ . २०२० रोजी मोहर्ली (बफर )वनपरिक्षेत्रातील सीतारामपेठ बीटातील संरक्षित वन कक्ष क्र. ९५६ च्या नाल्यामध्ये वाघिणीचा मृतदेह आढळून आला. तसेच त्या भागाची अधिकची पाहणी केली असता. १४.०६. २०२० रोजी आणखी वाघिणीच्या पिल्लाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. प्राथमिक दृष्ट्या वाघीण व दोन पिल्लांचा मृत्यू विषप्रयोगमुळे झाल्याच्या संशयावरून तपास केला असता. लगतच्या कोंडेगाव गावातील तीन आरोपी नामे १)सूर्यभान गोविंद ठाकरे वय-६० २)श्रावण श्रीराम मडावी वय -४७ ३)नरेंद्र पुंडलिक दडमल वय -४९ यांना सदर गुन्हच्या अनुषंगाने चौकशी साठी ताब्यात घेतले असून चौकशी केली असता त्यांनी गुहन्याने कबुली दिली. सर्व आरोपी हे कोंडेगाव शेतशिवारात मोह दारू काढण्याचे काम करतात दारू काढून निघालेल्या सडव्यावर डुक्कर मारण्याच्या उद्धेशाने थिमेट टाकले सदर परिसरात वाघाचा वावर असल्याने वाघा पासून आपला दारूचा धंदा बंद पडू नये मेलेल्या डुकरावरती आणखी विष प्रयोग करून वाघीण व दोन पिल्ले यांना मारण्यात आले. आरोपीचे ब्यान नोंदवून अटक करण्यात आली पुढील तपास सुरु आहे.
Related Articles
युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
चंद्रपूर : भद्रावती येथील पिपरबोडी वस्तीत नृत्य वर्ग चालविणा-या एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना काल रविवारी (28 आॅगस्ट) ला सायंकाळी घडली आहे. सूरज शंकर शेट्टी (३०) असे मृतकाचे नाव आहे. आरोपी फरार झाला आहे. या घटनेने भद्रावती शहर चांगलेच हादरले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती शहराला लागूनच असलेल्या पिपरबोडी वस्तीत सूरज शंकर शेट्टी […]
वृक्ष लागवडीच्या माध्यमातुन वसुंधरा मातेचे ऋण फेडूया – आ. सुधीर मुनगंटीवार
* देव संस्कृती विश्वविद्यालय हरीद्वार द्वारा आयोजित ६०० व्या रविवारीय वृक्षारोपण समारोह संपन्न वृक्ष लावणे व त्याची जोपासना करणे हे ईश्वरीय कार्य आहे. पर्यावरण संवर्धन तसेच नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण यासाठी वृक्ष लागवड अत्यंत आवश्यक आहे. धन या जन्माच्या शेवटच्या क्षणापर्यंत कामी येईल तर वन पुढच्या जन्माच्या सुरूवातीपासून कामी येईल. ज्या प्रमाणे जन्मदात्या आईचे ऋण आम्ही […]
हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 100 टक्के यशस्वी करा – जिल्हाधिकारी विनय गौडा
10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत मिळणार घरोघरी गोळ्या चंद्रपूर : हत्तीरोग ही चंद्रपूर जिल्ह्यातील गंभीर समस्या आहे. या रोगामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. यासाठी शासनाकडून राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. या कालावधीत आपल्या घरी औषधी / गोळ्या […]



