चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

चंद्रपूर : भद्रावती येथील पिपरबोडी वस्तीत नृत्य वर्ग चालविणा-या एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना काल रविवारी (28 आॅगस्ट) ला सायंकाळी घडली आहे. सूरज शंकर शेट्टी (३०) असे मृतकाचे नाव आहे. आरोपी फरार झाला आहे. या घटनेने भद्रावती शहर चांगलेच हादरले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती शहराला लागूनच असलेल्या पिपरबोडी वस्तीत सूरज शंकर शेट्टी (३०) हा युवक आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शहरातील जुन्या मच्छी मार्केट जवळ तो नृत्य वर्ग चालवायचा. आणि मजुरीचीही कामे करायचा. काल रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सूरजवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना लोकांना माहीत होताच दोन व्यक्तींनी त्याला स्कुटीवर बसवून येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. यावेळी रुग्णालयात येण्यास सर्व नागरिकांना येण्यास मनाई करण्यात आली होती. मृतकाच्या कुटुंबियांना सुद्धा आत प्रवेश देण्यात आला नव्हता. मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. भद्रावतीत गुन्हेगारीच्या घटनात वाढ होतेय. काही महिन्यापूर्वी भद्रावती शहरामध्ये एका युतीची निर्घूण हत्या करण्यात आली होती. डोके आणि धड वेगवेगळे करून एका नदीमध्ये डोक्याची विल्हेवाट लावण्यात आली होती. खूप दिवसापर्यंत या घटनेचा तपास लावण्यास विलंब झाला होता. तालुका ते जिल्हास्तरावरील संपूर्ण पोलिस यंत्रणा त्या युवतीच्या हत्येचा तपासात गुंतल्यानंतर त्या युतीच्या हत्तीचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले होते. शांत संयमी असलेले भद्रावती शहर आता गुन्हेगारीचे आलेखामध्ये वर चढत आहे. एका नृत्य वर्ग चालविणा-या युवकाच्या हत्येच्या घटनेने भद्रावती शहर हादरले आहे. शिवाय अन्य छोट्या मोठ्या घटना शहरात नित्याची बाब झाली आहे. आता सणासुदीचे दिवस सूरू झाले आहे. अशा स्वरूपाच्या घटनांवर आळा घालणे आणि शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलिस विभागाने विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.