
चंद्रपूर
माजी खासदार, कामगार नेते तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नामांकित नेतृत्व असलेल्या नरेशबाबु पुगलिया ह्यांनी भारतीय स्वांतत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्ती निमित्त चंद्रपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असुन दाताळा येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराच्या स्थापनेस 7 वर्ष पूर्ण होत असून भगवान बालाजींच्या पाचव्या ब्रम्होत्सव सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. 18 ते 20 दरम्यान चालणाऱ्या ब्रम्होत्सव तसेच 21 व 22 रोजी होणाऱ्या महोत्सवात चंद्रपूरकरांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
माजी खा. नरेश पुगलिया ह्याचाही ह्या वर्षी अमृत महोत्सव असुन त्यांच्या वाढदिवसाच्या औचीत्याने सर्वधर्मीय 278 जोडप्यांच्या सामुहिक विवाहाचे आयोजन देखिल करण्यात आले आहे. दाताळा येथील बालाजी नगरी मधे 20 मे रोजी सायंकाळी 7:00 वाजता 162 हिंदू, 98 बौद्ध, 6 ख्रिचन, 2 मुस्लिम व10 इतर जोडप्यांचा सामुहिक विवाह संपन्न होणार असून त्याच दिवशी संपुर्ण चंद्रपूरकरांसाठी मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 20 मे रोजीच 56 भोग चा नैवेद्य श्री बालाजींना दाखविण्यात येणार असून ह्याच 56 पदार्थांचा आस्वाद चंद्रपूरकरांना मिळणार असून जनतेचा 56 भोगाचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ह्यापूर्वीही नरेश बाबु पुगलीया ह्यांनी चंद्रपूर वासियांना 56 भोग मेजवानीचा आस्वाद दिला होता व चंद्रपूरकरांच्या जिभेवर आजही त्या पक्वान्नाची चव रेंगाळत आहे हे विशेष. महोत्सवाची सुरुवात 18 मे रोजी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे ह्यांच्या विविधांगी गायनाच्या कार्यक्रमाने होणार असुन चंद्रपूर वासियांच्या मनाचा ठाव घेणारी गीते आनंद शिंदे ह्यांची संपुर्ण चमू सादर करणार आहे. तर 19 मे रोजी मुंबई येथील उस्ताद मुनव्वर मासूम व कव्वाला रुबी राज ह्यांच्या कव्वालीचा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रम्होत्सवा निमित्याने होणाऱ्या 3 दिवसीय कार्यक्रमानंतर दिनांक 21 मे रोजी महाकाली मंदिरात येणाऱ्या यात्रेकरू व भाविकांसाठी सामुहिक भोजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 22 मे रोजी गांधी चौकापासून मॅरेथॉन स्पर्धेने होणार आहे.



