राजुरा (ता.प्र):: जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण वाढत आहे व मृत्यू ची संख्या वाढत आहे त्यामुळे चंद्रपुर व बल्लारपूर येथे चार दिवसांचे व्यापारांनी व प्रशासनाने कडकडीत बंद पाळण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील रुग्ण संख्या अधिक क्षेत्रातील अनेक तालुका ते गावपातळीवर स्वयंस्पुर्त बंद पाळण्यात येत आहे. शासन व प्रशासन ला सहकार्य म्हणून जनता कर्फ्यू चे आयोजन राजुरा शहर व्यापारी असोसिएशन ने केले आहे.दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे शहरातील दोन व्यक्ती कोरोना ने मृत्यू झाले आहे. राजूराच्या प्रथम नागरिक अरुण धोटे सहित काही प्रतिष्ठित व्यापारी सुद्धा संक्रमित झाले आहे. त्यामुळे संक्रमण व रुग्णाची संख्या कमी करण्यासाठी कोरोणा विषाणूची साकळी तोडणे गरजेचे आहे.हा उद्देश डोळ्या समोर ठेवून राजुरा शहरातील व्यापारी असोसिएशन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक आज उपविभागीय कार्यलय राजुरा येथे तालुका प्रशासकीय अधिकारी, ठाणेदार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरात बुधवार दि. 16 सप्टेंबर ते रविवार दि. 20 सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.शासन व प्रशासनाला सहकार्य म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जनता कर्फ्यू चार दिवसांचा असुन या कालावधीत सर्व दवाखाने, औषधांचे दुकाने, बॅंक व दुधवितरण व्यवस्था सुरु राहणार असून सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फ्रूट चे दुकाने, पान टपरी, चाय चे दुकाने, फुटपाथवरील दुकाने व इतर सर्व दुकाने बंद राहणार आहे.
Related Articles
वन विभागाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी “वन सेवा केंद्र” सुरू करण्यात येणार — वने मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : सामान्य नागरिकांना “आपले सरकार”च्या माध्यमातून अनेक सेवा सुविधा उपलब्ध होत असतात. याच धर्तीवर वन विभागामार्फत केंद्राच्या, राज्य शासनाच्या सेवा देण्यासाठी “वन सेवा केंद्र” सुरू करून यामार्फत वन विभागाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यात याव्यात, असे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान […]
भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमीत्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत
शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमीत्त निघालेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, करणसिंग बैस, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, मुन्ना […]
आता..नवरगाव जवळील सरांडी- खांडला या घाटातून होतेय रेती तस्करी
सिंदेवाही – तालुक्यातील जवळच असलेल्या नवरगाव जवळील सरांडी- खांडला या घाटातून होतेय रेती तस्करी तसेच मागील काही महिन्यात तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात असलेले पथक यांनी नवरगावातील एका रेती तस्कर चे रेती भरुण वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले व तहसील कार्यालय आवारा मध्ये जप्त केले आहे. तसेच काल मंगळवारी पहाटे रेती चोरी करून वाहतुक करताना एका रेती तस्कराचे […]



