राजुरा (ता.प्र):: जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण वाढत आहे व मृत्यू ची संख्या वाढत आहे त्यामुळे चंद्रपुर व बल्लारपूर येथे चार दिवसांचे व्यापारांनी व प्रशासनाने कडकडीत बंद पाळण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील रुग्ण संख्या अधिक क्षेत्रातील अनेक तालुका ते गावपातळीवर स्वयंस्पुर्त बंद पाळण्यात येत आहे. शासन व प्रशासन ला सहकार्य म्हणून जनता कर्फ्यू चे आयोजन राजुरा शहर व्यापारी असोसिएशन ने केले आहे.दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे शहरातील दोन व्यक्ती कोरोना ने मृत्यू झाले आहे. राजूराच्या प्रथम नागरिक अरुण धोटे सहित काही प्रतिष्ठित व्यापारी सुद्धा संक्रमित झाले आहे. त्यामुळे संक्रमण व रुग्णाची संख्या कमी करण्यासाठी कोरोणा विषाणूची साकळी तोडणे गरजेचे आहे.हा उद्देश डोळ्या समोर ठेवून राजुरा शहरातील व्यापारी असोसिएशन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक आज उपविभागीय कार्यलय राजुरा येथे तालुका प्रशासकीय अधिकारी, ठाणेदार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरात बुधवार दि. 16 सप्टेंबर ते रविवार दि. 20 सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.शासन व प्रशासनाला सहकार्य म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जनता कर्फ्यू चार दिवसांचा असुन या कालावधीत सर्व दवाखाने, औषधांचे दुकाने, बॅंक व दुधवितरण व्यवस्था सुरु राहणार असून सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फ्रूट चे दुकाने, पान टपरी, चाय चे दुकाने, फुटपाथवरील दुकाने व इतर सर्व दुकाने बंद राहणार आहे.
Related Articles
आमदार प्रतिभाताई यांची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासह जिल्हा प्रशासनासोबत ऑनफिल्ड
मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यात दोनवेळा पुराचा फटका जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांना बसला. जिल्ह्यातील वरोरा – भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जनजीवन विस्करीत झाले आहे. येथील मोठ्या प्रमाणात घरांची पाण्यामुळे पडझड झाली. शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी आमदार प्रतिभाताई यांची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासह जिल्हा प्रशासनासोबत ऑनफिल्ड पाहणी […]
युवापिढीने शिवाजी महाराजांच्या इतिहासातून स्फुर्ती घेत राष्ट्र विकासात योगदान द्यावे – हंसराज अहीर
चंद्रपूर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य रयतेचे होते, सर्वांच्या भल्याचे होते. त्यांच्या राज्यात माता भगिनींचा आदर व्हायचा त्यांच्या संरक्षणासाठी कायदे होते. महीलांवरील अन्याय, अत्याचाराविरुध्द कठोर शासन केले जायचे. आपल्या स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देणारा महाराजांचा राज्यकारभार होता. गणीमी काव्याव्दारा मुगलांना धडा शिकविणारे राजे म्हणुन महाराजांचा अखिल विश्वात लौकीक आहे. ते सर्वत्र […]
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा
चंद्रपूर – राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या पदास केंद्रीय गृहमंत्रालय द्वारे जारी पत्राद्वारे कॅबिनेट मंत्रीपदाचा समकक्ष दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून महामहिम राष्ट्रपतींनी दि 02 डिसेंबर, 2022 रोजी त्यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आता या पदास केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा लागू करण्यात आला आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी […]



